माझी बायको माझ्या
सोबत राहतही
नाही आणि मला सोडचीटी(Divorce) ही देत नाही
नमस्कार
वाचकहो!
तुम्हचा
दिवस शुभ असो!
आजचा विषय थोडा वेगळा आहे , हे तुम्हाला लेखाच्या
विषया वरुण समजलंच असेल . पण हा विषय तितकाच
गंभीर ही आहे. ह्या विषय संदर्भात मला बऱ्याच
वाचकांचे प्रश्न येत होते. म्हणून मला ह्या विषयाची निवड करावी लागली.
लग्न ही आपल्या सामाजिक व्यवस्थेतीतील सर्वात ,महत्वाची
सामाजिक व्यवस्था आहे . पण ह्या व्यवस्थेचे
प्रश्न ही तसेच बिकट आहेत . आणि आजकाल
तर हे प्रश्न वाढतच चालले आहेत . कोण चूक किवा कोण बरोबेर हे ठरवण माझ्या हातात नाही , पण ह्या
परिस्थितिवर काय मार्ग आहे फक्त मी हेच सुचवण्याची
योग्यता ठेवते .
“माझी बायको लग्नाच्या
11 महिन्या नंतर मला सोडून गेली. आणि माझ्या
वर आणि् माझ्या कुटुंबियानवर खोटे आरोप करणारी
केस दाखल केली आहे. मी
तिच्या सोबत राहण्यासाठी आणि पुनः नव्याने संसार करण्याचा प्रस्ताव ही ठेवला, पण तिला
माझ्या सोबत राहायचे ही नाही आणि मला सोडचिट्टि
ही द्यायची नाही.मला मानसिक आणि शारीरिक सुख
पासून तिने वंचित ठेवले आहे. मी हयातून कसा
मार्ग काढू?”
हा
प्रश्न मला माझ्या एक वाचकाने विचारलेला आहे.
प्रश्न
गंभीर आहे, आणि कौटुंबिक न्यायालयात
7 ते 10 वर्ष जुनी समान समस्या असणारी अनेक प्रकरण प्रलंबित आहेत .
पती किवा पत्नी जेव्हा कोणत्या ही कारणावरून
वेगळे होतात , तेव्हा ते बदला घेण्याच्या
भावनेने एकमेकाना न सोडत त्याच्यातील समस्यानना कुरवळत बसतात आणि स्वतः च
आयुष्य ही वाया घालवतात. जेव्हा वैयावहिक आयुष्यात तडजोड होत
नाही, तेव्हा सारासार विचार करून पती किवा पत्नी ने वेगळे होऊन आपल्या पुढील आयुष्या
चा विचार करणे नेहमी योग्य होते .
मला
वाचकाने विचारलेल्या प्रश्नांवर काही कायदेशीर
तरतुदी आहेत ज्या मी खालील प्रमाणे सोप्या
भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाला आहे .
v जेव्हा पत्नी पती सोबत राहण्यास तयार ही नाही आणि त्याला सोडचिट्टि ही देत नाही -
अश्या वेळी पती ने अधिक वेळ वाट न पाहता मा. कौटुंबिक न्यायालयात, Cruelty and Desertion ह्या प्राविधानखाली Divorce
फाइल करावा. (टीप- पती आणि पत्नी 2 वर्षा पेक्षा अधिक काळ , एकमेकण पासून दूर
असणे बंधनकारक आहे ) ही गोष्ट थोडी वेळ घेणारी आहे परंतु नाहक वाट पाहाण्या पेक्षा
खूपच योग्य आहे .
मी
आशा करते की मी प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ
शकले आहे आणि तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले
असेल ..
तुम्हच्या विनंतीला मान देऊन मी , माझे लेख आत्ता मराठी तून पण लिहिला सुरुवात केली आहे .मराठी ही आपली प्रथम
भाषा आहे आणि आणि माझे माहिती पूर्ण लेख इंग्रजी भाषेतून समजण्यासाठी बऱ्याच लोकान ना अडथळे येत होते. तुम्ही दिलेल्या प्रतिसाद नंतर
आणि तुम्ही वाचकांनी सुचवल्या प्रमाणे मी माझे
लेख इंग्रजी तसेच मराठी भाषेतून आणायचे ठरवले .
मी
कायदेशीर लेख लिहिण्याचा माझा उद्देश हाच आहे
की , सर्वसामान्य कायदेशीर माहिती ,सर्वसामान्य
लोकान परीयंत पोहोचावी . पण भाषेच्या निवडी मूळे ती सर्वाण परीयंत
पोहोचत नाही हे तुम्हच्या प्रतिसाद नंतर समजले.
अश्याच
नवनवीन माहिती पूर्ण लेखांसाठी मला Instagram वर फॉलो करा आणि माझे माहितीपूर्ण लेख आपल्या जाणकार व्यक्ती सोबत शेअर करायला विसरू नका
.
धन्यवाद!
Comments
Post a Comment