माझी बायको माझ्या सोबत राहतही नाही आणि मला सोड चीटी (Divorce) ही देत नाही नमस्कार वाचकहो ! तुम्हचा दिवस शुभ असो ! आजचा विषय थोडा वेगळा आहे , हे तुम्हाला लेखाच्या विषया वरुण समजलंच असेल . पण हा विषय तितकाच गंभीर ही आहे . ह्या विषय संदर्भात मला बऱ्याच वाचकांचे प्रश्न येत होते. म्हणून मला ह्या विषयाची निवड करावी लागली. लग्न ही आपल्या सामाजिक व्यवस्थेतीतील सर्वात ,महत्वाची सामाजिक व्यवस्था आहे . पण ह्या व्यवस्थेचे प्रश्न ही तसेच बिकट आहेत . आणि आजकाल तर हे प्रश्न वाढतच चालले आहेत . कोण चूक किवा कोण बरोबेर हे ठरवण माझ्या हातात नाही , पण ह्या परिस्थितिवर काय मार्ग आहे फक्त मी हेच सुचवण्याची योग्यता ठेवते . “माझी बायको लग्नाच्या 11 महिन्या नंतर मला सोडून गेली. आणि माझ्या वर आणि् माझ्या कुटुंबियानवर खोटे आरोप करणारी केस दाखल केली आहे. मी तिच्या सोबत राहण्यासाठी आणि पुनः नव्याने संसार करण्याचा प्रस्ताव ही ठेवला, पण तिला माझ्...